सत्तेचा माज ? …तर चामडी सोलून काढू; काँग्रेस आमदाराची भाजपा कार्यकर्त्यांना धमकी

भोपाळ : काँग्रेस कार्यकर्त्यांना हात लावण्याचा प्रयत्न केल्यास चामडी सोलून काढण्यासही मागे पुढे पाहणार नाही, अशी धमकी मध्य प्रदेशमधले काँग्रेसआमदार विजय चौरे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिली आहे. चौरे यांचा व्हिडीओ छिंदवाडातल्या सौसरमधला आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राज्यातले भाजपा नेते परिस्थिती बिघडली आहे, असा आरोप थेट त्यांनी भाजपवर केला आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावण्याचा प्रयत्न केलात, तर चामडी सोलून काढू,’ अशी धमकी देखील त्यांनी दिली आहे. छिंडवाडातल्या सौसरमध्ये काल एका सभेला संबोधित करताना काँग्रेस आमदार विजय चौरे यांनी वादग्रस्त विधान केलं.

Loading...

‘राज्यातल्या काँग्रेस सरकारनं एक वर्ष पूर्ण केलं आहे. या एक वर्षाबद्दल बोलण्यासारखं भाजपाकडे काही नाही. शांततामय वातावरण बिघडवण्याचं काम भाजपाच्या लोकांनी ५-७ दिवसांत केलं. सरकारनं एक वर्षात केलेली कामं सर्वांसमोर आहेत. त्यामुळे आता सौहार्दपूर्ण वातावरण खराब करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत,’ असे देखील ते म्हणाले.

दरम्यान, ‘नुकतेच भाजपाचे नेते इकडे येऊन गेले. लांबलचक भाषण देऊन गेले. कोणत्याही अवैध, अनैतिक कामांमध्ये आमचा सहभाग नाही. अवैध कामं तुम्ही करता आणि बदनाम मात्र काँग्रेसच्या मंडळींना करता. आता आम्ही हे सहन करणार नाही, हे लक्षात ठेवा,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश