काँग्रेस आमदाराने विधानपरिषद अध्यक्षांना हेडफोन फेकून मारला

Congress MLA threw headphone to the Council of Legislative Council

हैद्राबाद: काँग्रेसचे आमदार कोमाटिरेड्डी वेंकट रेड्डी यांनी तेलंगणा विधानपरिषद अध्यक्ष स्वामी गौड यंना हेडफोन फेकून मारला. हेडफोनमुळे गोड यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. तेलंगणा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदारांमध्ये मोठा राडा झाला.

Loading...

तेलंगणा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यपाल नरसिम्हन यांचं भाषण सुरू होताच काँग्रेसने विरोध करण्यास सुरुवात केली. काँग्रेसचे विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य खुर्चीवर उभे राहून राज्यपालांच्या भाषणादरम्यान जोरदार ओरडू लागले.

काँग्रेस आमदार शेतकरी आत्महत्या, कृषी संकट आदी विषयांवरील सरकारच्या उदासीनतेचा विरोध करत होते. त्यामुळे विधानसभेत गोंधळ पाहायला मिळाला. या गोंधळात काँग्रेसचे आमदार कोमातिरेड्डी वेंकट रेड्डी यांनी थेट हेडफोन विधानपरिषद अध्यक्षांना फेकून मारला. हल्ल्यात जखमी झालेल्या गौड यांना उपचारासाठी हैदराबादच्या सरोजिनी देवी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.Loading…


Loading…

Loading...