मराठी माणसाला झालेली मारहाण खपवून घेणार नाही; नितेश राणेंचा मराठी बाणा

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईतील रेल्वे स्टेशनवर बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात आक्रमक आंदोलन केल जात आहे. मात्र काल मालाड स्टेशनवर मनसेचे विभागाध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. यानंतर आता मनसे अधिकच आक्रमक झाली आहे. दरम्यान कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी मराठी ‘माणसांना अनधिकृत फेरीवाल्यांकडून केली जाणारी मारहाण सहन केली जाणार नाही, मग तो कोणत्याही पक्षाचा असो’ म्हणत मनसे कार्यकर्त्यांचं समर्थन केलं आहे.

comनितेश राणे यांनी मनसेच समर्थन करत असतानाच कॉंग्रेसवर निशाना साधला आहे. काँग्रेसला केवळ उत्तर भारतीयांचा पक्ष अशी ओळख ठेवायची आहे का? तसेच काँग्रेसला मराठी माणसांच्या मतांचीही गरज आहे. मात्र सध्या तरी तस दिसत नसल्याच ट्वीटही त्यांनी केलं आहे.

You might also like
Comments
Loading...