मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करा;कॉंग्रेस आमदाराच्या मागणीमुळे विधानसभेत गदारोळ

शिवसेना व भाजपचे आमदार आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा- मुंबई महापालिकेचे आयुक्त सर्व विभागांना न्याय देऊ शकत नसल्याने मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करा, अशी थेट मागणी आमदार नसीम खान यांनी विधानसभेत केली.नागपूरमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी साकीनाका आग प्रकरणाचे पडसाद उमटले. विधानसभेत चर्चेदरम्यान काँग्रेस आमदार नसीम खान यांनी साकीनाका येथील आगीचा मुद्दा उपस्थित केला. आयुक्तांच्या हलगर्जीपणामुळे अशा घटना घडतात. आयुक्त आणि अन्य अधिकारी जनतेला सुविधा देऊ शकत नसतील तर मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करावे, अशी मागणी त्यांनी केली.

नसीम खान यांनी हा मुद्दा उपस्थित करताच शिवसेना व भाजपचे आमदार आक्रमक झाले. त्यांनी नसीम खान यांच्या मागणीला विरोध दर्शवला. गदारोळामुळे कामकाज तहकूब करावे लागले.या मागणीवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी आक्षेप घेत हा मुंबईसाठी लढलेल्या शेकडो हुतात्म्यांचा अवमान असल्याचा आरोप केला. त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनाच्या मागणीवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

You might also like
Comments
Loading...