नाराज कॉंग्रेस आ अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, भाजप प्रवेशाची शक्यता ?

abdul sattar meets devendra fadanvis 1

टीम महाराष्ट्र देशा: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून उमेदवारीवर नाराज झालेले आ अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीस – सत्तार भेटीमुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. विखे, मोहिते पाटलांनंतर आता अब्दुल सत्तार देखील भाजप प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading...

लोकसभा तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी वाढत आहे. आता या मतभेदांनी बंडखोरीचे रूप घेतले असून पक्षाला याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते. आमदार अब्दुल सत्तार यांनी सुभाष झांबड यांच्या उमेदवारीला विरोध करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तार हे औरंगाबाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. झांबड यांच्या उमेदवारीबाबत आपल्याला विश्वासात घेतला नसल्याचा सत्तार यांचा दावा आहे. झांबड आणि सत्तार यांच्यात सुरु असणारे शीतयुद्ध आता निर्णायक लढाईच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे.

सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने ते भाजप प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास सत्तार यांना शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करावा लागू शकतो.

1 Comment

Click here to post a comment







Loading…










Loading…

Loading...