माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, काँग्रेस आमदाराचा भाजपला पाठींबा

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठा धक्का बसला आहे, माढा मतदारसंघात समाविष्ट माण – खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपला पाठींबा दिला आहे. जयकुमार गोरे हे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचे जवळचे मित्र म्हणून देखील परिचित आहेत. गोरे यांच्या भूमिकेमुळे आघाडी तसेच संजय शिंदे यांना धक्का मानला जात आहे.

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचं पहायला मिळत आहे, यामध्ये माण – खटाव तालुक्यातील युवा नेते शेखर गोरे यांनी देखील पक्षाला रामराम केला आहे. गोरे यांनी काही दिवसांपूर्वी फलटणमध्ये आयोजित कार्यकर्ता बैठकीत खुद्द शरद पवार यांच्या समोर राडा घातला होता. पक्षातील कोणीही पवारांच्यापुढे मोठ्या आवाजाने बोलण्याची हिम्मत करत नसताना गोरे यांनी घातलेला राडा गाजला होता.

Loading...

तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजवर माझ्यावर अन्याय केला आहे, पक्षातील नेत्यांनीच माझे खच्चीकरणच केले. अंतर्गत राजकारणाचा मला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे युवा पिढीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नादी लागून आपले आयुष्य खराब करू नये, असा घणाघात गोरे यांनी केला आहे. माढ्यातील भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बाहेरून पाठींबा देत असल्याचं गोरे यांनी यापूर्वीच घोषित केले आहे.

शेखर गोरे हे माणचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांचे भाऊ आहेत, गोरे यांनी आपल्याच भावाच्या विरोधात जात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसेकडे बहुमत असताना देखील गोरे यांना पराभव पत्कारावा लागला होता. पक्षातील गटबाजीमुळेच आपण पराभूत झाल्याचा आरोप यावेळी यांनी केला होता.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'