आमदार गोरेंचा भाजप प्रवेश ही आफवाचं, प्रवेश करणार नसल्याचे दिले संकेत

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशासोबत कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असतानाचं आमदार गोरे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

Loading...

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगलेल्या असताना, कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजपत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते यामध्ये आमदार जयकुमार गोरेंचाही समावेश होता, परंतु काल राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश झाला त्यांची मंत्रिमंडळात वर्णीही लागली. दरम्यान, आमदार गोरेंचाही भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. परंतु आमदार गोरेंच्या भाजप प्रवेशाला भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांनी विरोध केल्याचे दिसून येत होते.

याचदरम्यान, गोरे यांना भाजपात प्रवेश देऊ नये, असा ठरावही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने करण्यात आला. परंतु मी भाजपमध्ये जाणार असं त्यांना कोणी सांगितलं. असे गोरे यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, भाजपमध्ये मी जाणार असं म्हणणाऱ्यांनी आधी डोकं तपासून घ्यावं. माझ्याविरोधात ठराव करणारे सर्वजण अदखलपात्र आहेत. माझं नाव घेण्याचा अधिकार तरी त्यांना आहे का ? त्यांनी पहिल्यांदा स्वत:चं अस्तित्व पहावं. गावात त्यांची लायकी आहे का हे ही बघावं अशी टीकाही गोरे यांनी केली होती. गोरे यांच्या या वक्तव्यातून ते भाजपात प्रवेश करणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

 Loading…


Loading…

Loading...