काँग्रेस आमदाराचा पैसे उडवतानाचा व्हीडिओ व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा : एकेकाळी गरिबी हटाव चा नारा देणाऱ्या कॉंग्रेसच्या आमदाराने चक्क एका कार्यक्रमात नोटा उधळत आपल्या धनसंपत्तीचे ओंगळवाणे दर्शन घडवले आहे.गुजरातमधील ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. ठाकोर यांच्या या कृतीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हा व्हीडिओ गुजरातमधील पाटणा येथील एका धार्मिक कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात अल्पेश ठाकोर नोटा उडवताना दिसत आहेत.गुजरातमधील भजनाच्या कार्यक्रमात पैसे उडवले जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. नोटाबंदीनंतरच्या काळात एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असताना गुजरामधील नवसारी येथील एका कार्यक्रमात एका भजन समारंभात ४० लाख रुपयांच्या नोटा उधळण्यात आल्या होत्या.

राजस्थान सरकार साजरी करणार नोटाबंदीची वर्षपूर्ती

नोटांवर लिहिलं अथवा रंग गेल्यास आता चिंता नाही