शासकीय निवासस्थान न मिळाल्याने कॉंग्रेस मंत्री मुख्यमंत्र्यांवर नाराज

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर त्यांनी एका पाठोपाठ एक महत्त्वाच्या निर्णयांचे धडाकेच लावले. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप केले. मात्र काँग्रेस मंत्री अजूनही वेटींगवर असल्याने कॉंग्रेस पक्षात नाराजी असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप करण्यात आलं आहे. पण बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना मात्र अद्यापही शासकीय निवासस्थान दिले गेले नाही.

शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अद्याप खात्याचं वाटप तर नाहीच पण शासकीय निवासस्थान वाटप झालं नसल्याने काँग्रेस पक्षात नाराजीचा सूर असल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा उदय झाला आहे. मात्र पाच वर्षांत सहमतीने सरकार चालवण्याचं मोठं आव्हान या तीनही पक्षांसमोर असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

 

Loading...