fbpx

विरोधीपक्ष नेता निवडीसाठी कॉंग्रेसच्या हालचाली, खरगे घेणार मुंबईत बैठक

kharge

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विधिमंडळ विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसने विरोधीपक्ष नेता निवडीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासंदर्भात कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस आमदारांची मुंबईत बैठक घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ.सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर विखे पाटील यांनी देखील विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला. कॉंग्रेसकडून तो स्वीकारण्यात आला आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने कॉंग्रेसला सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावावी लागणार आहे. यासाठी विरोधी पक्षनेते पदी प्रभावी चेहरा देण्यासाठी कॉंग्रेसकडून चाचपणी केली जात आहे.

विरोधीपक्ष नेते पदासाठी जेष्ठ नेते आणि विखे पाटलांचे पक्षांतर्गत विरोधक राहिलेले बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांची नावे आघाडीवर आहेत.