राहुल गांधींच्या कॉंग्रेस अध्यक्षपदावर आज होणार शिक्कामोर्तब ?

टीम महाराष्ट्र देशा: राहुल गांधी यांची लवकरच कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते. या बाबतचा घडामोडींना कॉंग्रेसच्या वर्तुळात वेग आला असून आज काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. सध्या 10 जनपथवर ही बैठक सुरू असून काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीद्वारे अध्यक्षपदाच्या निवडीच्या तारखांची निश्चिती होऊ शकते.

सध्या गुजरात विधानसभा निवडणुकांत राहुल गांधी यांचा जोरदार प्रचार सरू आहे, तसेच गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या राजकीय वातावरणामुळे त्यांची प्रतिमाही सुधारत आहे. या सर्व गोष्ठी पाहता त्यांची अध्यक्षपदी वर्णी लावण्याची ही चांगली संधी असल्याच्या चर्चा कॉंग्रेस नेत्यांमध्ये सुरु आहेत. दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड लोकशाही पद्धतीने होत असते. पण राहुल गांधी शिवाय कोणीच अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला नसल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध अध्यक्षपदी होऊ शकते.

You might also like
Comments
Loading...