पुणे : भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असणाऱ्या कलमाडी यांना उमेदवारी देण्याची कॉंग्रेसची तयारी

पुणे : माजी खासदार सुरेश कलमाडी यांना कॉमनवेल्थ घोटाळा उघडकीस आल्यानंतर कॉंग्रेस पक्षातून निलंबित व्हावे लागले होते. मात्र आता याच सुरेश कलमाडी यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून उमेदवारी दिली जाऊ शकते, असे वक्तव्य अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस आणि महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

नेमकं काय म्हणाल्या सोनल पटेल?
कलमाडी लोकप्रिय नेते आहेत. सर्व पक्षांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी झाल्यास पक्षाकडून त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. कलमाडी हे दावेदार असले तरी पक्षातील अन्य नेतेही निवडणूक लढविण्यास आणि जिंकून येण्यास सक्षम आहेत.

You might also like
Comments
Loading...