राजू शेट्टी यांच्या गळ्यात कॉंग्रेसच मंगळसूत्र- संजय कोले

raju shetty and rahul gandhi

सांगली: शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली आहे. राजू शेट्टी यांनी राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर भाजपप्रणित एनडीएची साथ सोडलेले राजू शेट्टी आता यूपीएची साथ देणार? असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहेत.

Loading...

संजय कोले म्हणाले, काँग्रेसने शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर वेगवेगळ्या कायद्यातून टाच आणली आणि आता त्याच काँग्रेससोबत राजू शेट्टी काही दिवसात गेलेले दिसतील. तसेच राजू शेट्टी हे मूळचे काँग्रेसचेच आहेत. पण आजपर्यंत आपल्या गळ्यातील मंगळसूत्र कुणाचं आहे हे ते सांगत नव्हते. मात्र राहुल गांधींसोबतच्या भेटीमुळे ते मंगळसूत्र कॉंग्रेसच असल्याच स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस प्रणित युपीए आघाडीमध्ये जाणार असल्याची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे, मात्र आम्ही अद्याप कोणत्याही आघाडीमध्ये सामील झालेलो नाही, कोणाशीही आघाडी करायची असल्यास पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाते आणि नंतरच निर्णय होतो. सध्यास्थितीला सर्व राजकीय पक्षाशी आम्ही समान अंतरावर असून अशा बातम्या म्हणजे केवळ वावड्याच असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र देशाशी बोलतांना स्पष्ट केलं आहे.Loading…


Loading…

Loading...