काँग्रेस आमदाराने विधानसभेत भाजप आमदाराला चक्क पट्ट्याने चोपले

लोकशाहीचे मंदिर समजल्या जाणारे सभागृह आता हाणामारीचे ठिकाण

गांधीनगर (गुजरात): काँग्रेसचे आमदार कोमाटिरेड्डी वेंकट रेड्डी यांनी तेलंगणा विधानपरिषद अध्यक्ष स्वामी गौड यंना हेडफोन फेकून मारल्याची घटना ताजी असतांनाच आता
गुजरात विधानसभेत राडा झाला आहे. विधानसभेत काँग्रेस आमदाराने सत्ताधारी भाजप आमदाराला चक्क पट्ट्याने चोपल आहे. त्यामुळे लोकशाहीचे मंदिर समजल्या जाणारे सभागृह आता हाणामारीचे ठिकाण म्हणून चर्चेत आहेत.

प्रताप दुधात हे काँग्रेसचे निकोल मतदारसंघाचे आमदार आहेत. यांनी भाजप आमदार जगदीश पांचाळ यांना चक्क कमरेच्या पट्ट्याने मारलं. इतकंच नाही तर माईकची तोडफोड केली. दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विक्रम माडम यांनी माईक तोडला, तर राजुलाचे आमदार अंबरीश डेर यांनीही भाजप आमदाराला मारहाण केली. विधानसभा म्हणजे राज्याच्या प्रश्नांवर उत्तरं शोधण्याचं ठिकाण. मात्र हल्ली राज्यांची सर्वोच्च सभागृह चर्चांपेक्षा कुस्तीचे मैदानंच होत आहेत. त्याचीच प्रचिती गुजरात विधानसभेत आली.