राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनीच कॉंग्रेस संपवली, सत्तारांचा अशोक चव्हाणांना टोला

टीम महारष्ट्र देशा : कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आपल्या कॉंग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये घुसमट होत असून त्यामुळे आज आमदारकीचा राजीनामा दिला, असं यावेळी विखे पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, विखे पाटील यांनी राजीनामा देण्यापूर्वी समर्थक आमदारांची बैठक घेतली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरचे कॉंग्रेस आ. भारत भालके आणि माण- खटावचे जयकुमार गोरे हे देखील उपस्थिती होते. तर बैठक संपताच आ.अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Loading...

यावेळी सत्तार म्हणाले की, काँग्रेसचे आणखी 8 ते 10 आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. तसेच राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमुळे आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे नाराज झालेल्या आमदारांवर भाजपात जाण्याची वेळ आली आहे. तसेच राज्यातील कॉंग्रेसचे नेते पक्षाला संपवत असल्याचा आरोपही सत्तार यांनी अशोक चव्हाण यांचे नाव न घेता केला.

दरम्यान  अब्दुल सत्तार यांनी काल भाजपाचे महत्वाचे नेते गिरीष महाजन यांची भेट घेतली होती. यानंतर आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी नाराज आमदारांसोबत बैठकही घेतली होती. तसेच विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला तेव्हाही सत्तार सोबत होते.Loading…


Loading…

Loading...