घराणेशाहीला कंटाळून कॉंग्रेस नेत्याचा भाजप मध्ये प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप पक्षाकडे धाव घेतली आहे. केरळमधील अशाच एका कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने कॉंग्रेसच्या केला आहे. त्यामुळे पक्ष जरी भाजप सरकारला धुळीत मिळवण्याच्या गोष्टी करत असला तरी, कॉंग्रेस नेते मात्र भाजपलाच जवळ करताना दिसत आहेत.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते टॉम वडक्कन यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. टॉम वडक्कन हे कॉंग्रेसचे एकेकाळचे प्रवक्ते होते. पण टॉम वडक्कन आता कॉंग्रेसच्या घराणेशाहीला कंटाळले आहेत त्यामुळे त्यांनी भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसला टॉम वडक्कन यांच्या जाण्याचा कॉंग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.