काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या कुटुंबाच्या भल्याच्या विचार केल्यामुळे विदर्भ मागे ; नितीन गडकरी

कॉंग्रेसने विदर्भात विकासाला गती देण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाही

नागपूर : विदर्भ वेगळा करावा म्हणून अनेक राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. विदर्भ मागे राहण्याला काँग्रेसचे नेते जबादार असल्याच विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या कुटुंबाचा व मुलांच्या भल्याचा विचार केला. त्यामुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळू शकली नाही.आज नागपूर मिहानमधील एचसीएल कंपनीच्या कॅम्पसचे उद्घाटनावेळी नितीन गडकरी बोलत होते.

काय म्हणाले निरीन गडकरी ?

काँग्रेस नेत्यांनी विदर्भात शाळा, महाविद्यालये, मेडीकल कॉलेज, अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू केली. मात्र विदर्भात विकासाला गती देण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाही. तसेच मिहानमध्ये जागा खरेदी केल्या. मात्र उद्योग सुरू झाले नाही. यामुळे विदर्भाचा विकास खुंटला.

मिहानमधील गुंतवणूक मागे घेण्याच्या तयारीत अनेक उद्योजक होते. एचसीएलचे मालक शिव नाडर यांनीही गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांना संपूर्ण सोयीसुविधा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी गुंतवणूक कायम ठेवली व हा प्रकल्प सुरू झाला. गेल्या काही वर्षांपासून विदर्भाचा चेहरामोहरा बदलत आहे. विकासाचे अनेक प्रकल्प विदर्भात सुरू आहेत. विदर्भाच्या विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातून रोजगाराची निर्मिती होणार आहे. विदर्भातील बेरोजगारांना यातून रोजगार मिळेल.