कार्ती चिदम्बरम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेसने आणखी दहा उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली. माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदम्बरम यांना तामिळनाडूतील शिवगंगा येथून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कार्ती चिदम्बरम यांना उमेदवारी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत कार्ती यांचा शिवगंगा मतदारसंघामध्येच पराभव झाला होता.कार्ती यांना उमेदवारी दिल्यामुळे कॉंग्रेसमध्ये नाराजी वाढू लागली आहे. तामिळनाडू कॉंग्रेसमधील जेष्ठ नेते ईएम सुदर्शन नचियप्पन यांनी याच मुद्द्यावरून पक्षाला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. कार्तीला उमेदवारी दिल्याने पक्षाची प्रतिमा मलीन होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसेल असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला.

Loading...

दरम्यान, या नव्या यादीत कर्नाटकमधील दक्षिण बेंगळुरु येथून बी.के.हरिप्रसाद यांना तर महाराष्ट्रातील अकोलामधून हिदायत पटेल यांना, रामटेक येथून किशोर गजभिये, चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर तर हिंगोलीतून सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसमधील नियोजनशून्यता आणि अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. काँग्रेसने चंद्रपुरातील उमेदवार बदलला असून, आता शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्याची नामुष्की कॉंग्रेसवर ओढवली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ