शिर्डी लोकसभेसाठी कॉंग्रेस करू शकते या तरुण चेहऱ्याचा विचार !

टीम महाराष्ट्र देशा : पूर्वाश्रमीचा कोपरगाव म्हणजेच आताचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ. गेल्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला. अगदी सुरुवातीला दिवंगत अण्णासाहेब शिंदे आणि नंतर दिवंगत बाळासाहेब विखे-पाटील अशा दोन दिग्गजांनी संसदेत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. शिंदे यांना प्रदीर्घ काळ केंद्रात मंत्रीपदाचीही संधी मिळाली. दिवंगत ज्येष्ठ नेते शंकरराव काळे यांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात या लोकसभा मतदारसंघानेच पहिल्यांदा स्वीकारलं.

साखर कारखानदारी आणि सहकारी संस्थांच्या मजबूत पायावर काँग्रेसची पकड असलेल्या या मतदारसंघात अनपेक्षितरित्या भाजपने कधीकाळी झेंडा रोवला. त्याला कारणीभूतही विखेच होते. राज्याच्या पातळीवर नेतृत्व करू शकतील अशा जिल्ह्यातील नेत्यांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघाची आता राजकीय घडी पूर्णत: विस्कटली आहे. कॉंग्रेसने आपली पत या मतदारसंघात गमावली असली तरी आता ती पुन्हा मिळवण्यासाठी कॉंग्रेसनेतृत्व तुषार पोटे या तरुण चेहऱ्याला उमेदवारी देऊ शकते.

Loading...

तुषार पोटे हे कोपरगावमधील युवक कॉंग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. राहुल गांधी आणि सत्यजीत तांबे यांच्या यंग ब्रिगेड मधील नगर जिल्ह्यातील फायरब्रँड कार्यकर्ते म्हणून तुषार पोटे यांची ओळख आहे. २००६ साली वयाच्या १७व्या वर्षी विद्यार्थी कॉंग्रेसचा नगर शहरात तुषार पोटे यांना आवाका वाढवला. २८ वर्षीय तुषार पोटे देशातील सर्वात युवा खासदार होऊ शकतात ते इन्फोसिस मधे नोकरीस होते काम करण्याची पद्धत व अचुक नियोजन ही त्यांची जमेची बाजू आहे. इम्पोर्ट – एक्स्पोर्ट मध्ये एमबीए झालेले पोटे कॉंग्रेसला शिर्डी लोकसभेसाठी एक युवा आणि शिक्षित चेहऱ्याची असलेली उणीव भरून काढू शकतात.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांना दक्षिणेतून (अहमदनगर लोकसभा मतदारसंघ) लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्यामुळे दक्षिणेला काँग्रेस, तर उत्तरेत राष्ट्रवादी अशी आदलाबदल होण्याचीही चर्चा जोर धरु लागली आहे. अस झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस देखील तुषार पोटे यांच्या नावाचा विचार करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर आघाडीचे उमेदवार म्हणून पोटे यांनी आघाडी घेतल्याचं दिसत आहे.

मतदारसंघात बदल झाल्यास आघाडीकडून रिपाईला सोडचिठ्ठी दिलेले अशोक गायकवाड, साहित्यिक उत्तम कांबळे आणि भारद्वाज पगारे, उत्कर्षा रुपवते, काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र आरक्षित शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी जागेची अदलाबदल करते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र उत्कर्षा रुपवते या बाहेरील उमेदवार असल्याने आघाडी त्यांच्यावर डाव खेळेल का हे पाहण सुद्धा महत्वाच आहे.

युवक क्रांती यात्रेत युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी युवकांना लोकसभेत संधी देण्यात यावी म्हणून वारंवार आग्रहाची मागणी केल्याच दिसून येत आहे. एवढच नाही तर ‘बाप योग्य ठिकाणी थांबले तरचं पोरं पुढं जातील’ अस वक्तव्य करून सत्यजीत तांबे यांनी यंग ब्रिगेडचा नारा दिल्याने तो पोटेंच्या पथ्यावर पडताना दिसत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी