कॉंग्रेस नेत्याची हरियाणात गोळ्या घालून हत्या

टीम महाराष्ट्र देशा : हरियाणातील फरिदाबाद येथे मंगळवारी काँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येबाबत कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

विकास चौधरी हे नेहमीप्रमाणे जिमला गेले असताना ते जिममधून बाहेर पडताच ते आपल्या गाडीत बसताना काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर आठ ते दहा गोळ्या झाडल्या. प्रवासादरम्यान चौधरी यांच्यावर हा हल्ला झाला असून त्यांना जखमी अवस्थेत स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Loading...

 

हल्ला नेमका कोणी केला याबाबत अद्याप माहिती मिळाली नसून सदर घटनेतील हल्लेखोरांचा तपास स्थानिक पोलीस करत आहे. काँग्रेस नेत्यांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. हरियाणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांनी सध्या राज्यात जंगलराज असल्याची टीका करत काही दिवसांपूर्वी झालेल्या महिलेच्या खुनाचाही तपास झाला पाहिजे, अशी मागणी केली.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला