मंत्रीसाहेब शेतकरी कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज तुम्ही भरून दाखवा

कॉंग्रसचे ,पणनमंत्री सुभाष देशमुख यांना आव्हान

मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्याना कर्ज माफी दिलीय खरी मात्र रोज निघणारे निघणारे नवनवीन पत्रक आणि नियम अटीमुळे नेमक कर्जमाफी कशी मिळवायची असा प्रश्न शेतकऱ्याना पडला आहे.

याच मुद्यावरून आता विरोधक सरकारवर निशाना साधत आहेत. ‘शेतकरी कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्जावरून काँग्रेसनं सरकारला घेरलंय. सहकार मंत्र्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय ऑनलाईन अर्ज भरून दाखवावा’, असं खुलं आव्हान काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी पणनमंत्री सुभाष देशमुख यांना दिलं आहे.

bagdure

शेतीची कामं सोडून शेतकरी अर्ज भरणार का? असा सवालही सतेज पाटलांनी केला आहे. ग्रामीण भागात बहुतेक ठिकाणी इंटरनेट सेवा सुरळीतपणे उपलब्ध होत नाही. मग कर्जमाफीच्या ऑनलाईन १५ पानी अर्जाचे सगळे रकाने भरणं शेतकऱ्यांसाठी अशक्य प्रक्रिया असल्याचं सतेज पाटील यांनी म्हंटल आहे.

 

 

You might also like
Comments
Loading...