#Article370 : लोकशाही मानणाऱ्या प्रत्येकाने ओमर अब्दुल्ला यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे

blank

टीम महाराष्ट्र देशा- गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवला आहे. हा प्रस्ताव सभागृहात मांडताच विरोधकांनी मोठा गदारोळ घातला. जम्मू काश्मीरचे विभाजन करण्यात आले असून जम्मू-काश्मीरसह लडाखलाही केंद्रशासित घोषित करण्यात आले आहे. म्हणजेच जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होणार आहेत.

कलम ३७० हटवले गेल्यामुळे जम्मू-काश्मीर आता राज्य राहिले नाही. जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेश होईल. लडाखला विना विधेयकाचे केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहे.याविषयी जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करून ‘आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे अस त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी या निर्णयावरून हे कलम हटवणे हे अनैतिक आणि असंवैधानिक आहे असंही त्यांनी म्हटले आहे.

हा प्रस्ताव राज्यसभेत मांडला गेल्यानंतर कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी थयथयाट सुरु केला असून संसदेत गोधळ घालायला सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते शशी थरूर हे मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवल्यामुळे संतापले आहेत. ओमर अब्दुल्ला तुम्ही एकटे नाही असं म्हणत त्यांना पाठिंबा दिला आहे. लोकशाही मानणाऱ्या प्रत्येक माणसाने ओमर अब्दुल्ला यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे असं थरूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच मोदी सरकारचं हे चाललंय काय? असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

आझाद काश्मीरची भूमिका मांडणारे काही लोक तिथे होते, मात्र मेहबूबा मुफ्ती, गुलाबनबी आझाद, फारूक अब्दुल्ला यांच्या सारखे भारताशी निष्ठा असणारे काही लोक काश्मीरात आहेत. हे सर्वजण अतिरेकी भूमिका घेणाऱ्यां विरोधात भारताची भूमिका अखंडपणे मांडत आले आहेत, मात्र भारतासोबत निष्ठा असणाऱ्या लोकांना बाजूला ठेवून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

दुष्काळी भागात उभारलेल्या चारा छावण्यात आहे तब्बल ‘इतके’ पशुधन

शिवसेनेमुळे दुतोंड्या वाघ पाहण्याचं भाग्य मिळाल : कॉंग्रेस

पक्ष फोडणे हे हिटलरशाहीचे लक्षण; प्रकाश आंबेडकरांची भाजप-सेनेवर टीका