‘नरेंद्र मोदी औरंगजेबाचे आधुनिक अवतार’ संजय निरुपम यांचे वादग्रस्त विधान

sanjay-nirupam

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेते विरोधकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. या दरम्यान अनेक नेत्यांची जीभ घसरताना दिसत आहे. अशातच कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.

वाराणसी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘इथल्या लोकांनी ज्यांनी निवडून दिले ते औरंगजेबाचे आधुनिक अवतार आहेत, कोरीडोरच्या नावाखाली मोदींच्या इशाऱ्यावर शेकडो मंदिरे तोडण्यात आली’. तसेच मोदींच्या इशाऱ्यावरच बाबा विश्वनाथ यांच्या दर्शनासाठी ५५० रुपयांची फी लावण्यात आली हे या गोष्टीचे प्रमाण आहे की जे काम औरंगजेब करू शकला नाही ते नरेंद्र मोदी करत आहेत असा आरोप त्यांनी मोदींवर केला आहे.

पुढे बोलताना निरुपण यांनी दर्शनासाठी लावण्यात आलेल्या फी ला औरंगजेबाच्या ‘जजीया’ कराची उपमा दिली दिली आहे.