काँग्रेस नेते संजय निरुपम यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : लॉकडाऊन न लावता ‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली सर्व बाजारपेठा बंद केल्यामुळे विविध स्थरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होत आहे. भाजप आणि मनसेच्या वतीनेही या निर्णयाला विरोध करण्यात येत आहे. त्यातच सरकारमधील काही मंत्री या निर्णयाच्या विरोधात आहेत. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी देखील ठाकरे सरकारच्या या निर्णयावर टीका केलीय.

संजय निरुपम यांनी सोशल मीडियावर या संदर्भात एक पोस्ट केलीय. यामध्ये त्यांनी लिहिले की, लॉकडाऊन न लावता सरकारला कडक नियम लावण्याचे वारंवार सांगण्यात येत होते. मात्र, सरकारने निर्बंधाच्या नावाखाली सर्व काही बंद केले आहे. आता सोमवारच्या आधी नवीन नियमावली जाहीर करा, नसता नागरिक रस्त्यावर येतील, अशा इशाराही निरुपम यांनी राज्य सरकारला दिला आहे.

‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली राज्यातील सर्व बाजारपेठा बंद केल्यामुळे राज्यात विविध ठिकाणी विरोध होत आहे. व्यापारी संघटनांनी देखील ठाकरे सरकारच्या या निर्णयाला विरोध केलाय. त्यात मंत्रीमंडळातील काही मंत्री देखील या निर्णयाच्या विरोधात आहेत. सत्तेत सोबत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनीही आता या निर्णयावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :