बुलेट ट्रेनच्या गप्पा पुरे, आधी लोकल सेवा सुरक्षित करा – संजय निरुपम

sanjay-nirupam

टीम महाराष्ट्र देशा : ‘रेल्वेमंत्री कधी पूल बांधण्यासाठी लष्कराला मुंबईत आणतात, तर कधी बुलेट ट्रेनच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. हे सर्व करण्याआधी त्यांनी मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरक्षित करावा, आता बुलेट ट्रेनच्या गप्पा पुरे, अशा शब्दांत मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी अंधेरीतील पूल दुर्घटनेवरुन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.

अंधेरीजवळचा पादचारी पूल आज सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी कोसळला. पुलाचा बराचसा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला. यावरुन काँग्रेसनं सरकारवर निशाणा साधला आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. थोड्याच वेळात रेल्वेमंत्री नियोजित बैठकीसाठी मुंबईला येणार आहेत.