fbpx

काँग्रेसवर मुस्लिमांच्या रक्ताचे डाग; ‘मी’ देखील दोषी – खुर्शिद

अलीगड – काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी कायदे मंत्री सलमान खुर्शिद यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिलाय. काँग्रेसवर मुस्लिमांच्या रक्ताचे डाग असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलय.

अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या वार्षिक उत्सवात सहभागी झालेल्या खुर्शिद यांना अलीगड मुस्लिम विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने  सवाल केला, की 1948 मध्ये एएमयू अॅक्टमध्ये पहिले संशोधन झाले. त्यानंतर 1950 मध्ये राष्ट्रपतींचा आदेश आला, त्यामुळे मुस्लिमांचे आरक्षण काढून घेण्यात आले. त्यानंतर हाशिमपूरा, मलियाना आणि मुझफ्फरपूर सारख्या दंगली भडकल्या. याशिवाय बाबरी मशिदीची शहादत हे सर्व काँग्रेसच्या काळात झाले. मुस्लिमांच्या रक्ताचे डाग काँग्रेसवर उडाले ते तुम्ही कसे स्वच्छ करणार?

यावर बोलताना खुर्शिद म्हणाले, ‘काँग्रेसवर मुस्लिमांच्या रक्ताचे डाग आहेत. मी काँग्रेस नेता असल्याने माझ्यावरही ते शिंतोडे उडाले आहेत. मीदेखील दोषी आहे. मात्र ते तुमच्यावर उडू नये यासाठी या घटनांमधून तुम्ही बोध घेतला पाहिजे.