fbpx

शिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. पहले मंदिर फिर सरकार बोलणारी शिवसेनेला आता सरकार मध्ये सामील झाल्यावर राम मंदिर आठवत आहे अशी टीका सचिन सावंत यांनी केली. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकी आधी शिवसेने भाजपमध्ये बरेच मतभेद झाले. ओक्सभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे वक्तव्यही सेना भाजपच्या नेत्यांनी केले होते. इत्केच्ह नव्हे तर, पहले मंदिर फिर सरकार असे वक्तव्यही शिवसनेने केले होते. उद्धव ठाकरे यांनी आयोध्येत जात आरतीही केली होती. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षांनी युती केली.

याचदरम्यान, शिवसेनेच्या राम मंदिराच्या मुद्यावरून सचिन सावंत यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. पहले मंदिर फिर सरकार बोलणारी शिवसेनेला आता सरकार मध्ये सामील झाल्यावर राम मंदिर आठवत आहे. तद्दन स्वार्थी, विचार हीन आणि लोकांच्या भावनांशी खेळ मांडणारा हा पक्ष आहे. रामाचाही उपयोग राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे. अशी टीका सावंत यांनी केली.