आउटगोइंग सुरूच …. कॉंग्रेसच्या आणखी एका जेष्ठ आमदाराचा राजीनामा

Congress

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकातील राजकीय नट्य सुरूच आहे. कर्नाटकात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते रोशन बेग यांनीही आमदारकीचा राजीनामा दिल्याने कॉंग्रेस आणखी अडचणीत आली आहे.

दरम्यान,या नाट्यात आता सस्पेंन्स आणखी वाढला असून विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी काँग्रेस – जेडीएसच्या १४ आमदारांचे राजीनामे नामंजूर केले आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे आता कर्नाटकातील राजकीय पेच कायम आहे.