कोंग्रेस नेते रोहित टिळक यांचा अटक पूर्व जामीन कायम

पुणे : बलात्कार केल्याचा आरोप असणारे शहर काँग्रेसचे पदाधिकारी व युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रोहित टिळक यांच्या प्रकरणावर आज पुणे न्यायालयात सुनावनी झाली यावेळी रोहीत टिळकांचा यांचा अटकपुर्व  जामीन कायम ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश एल एल येनकर यांनी दिला आहे. १५ हजार रूपयांच्या जात मुचलकयावर हा जामीनमंजूर करण्यात आला आहे.
रोहित टिळक यांच्याविरुद्ध  विश्रामबाग पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होते. या संदर्भात टिळक यांच्याविरुद्ध एका महिलेने विश्रामबाग वाडा पोलीस ठाण्यात तक्रोर अर्ज दिला होता. या संदर्भात बलात्कार, धमकावणे याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले. रोहित टिळक यांनी आपल्याला धमकावून बलात्कार केला असल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. तक्रारदार महिलेने यापूर्वी टिळक यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

जामीन मंजूर करताना न्यायालयाने या अटी घातल्या आहेत

१)रोहित टिळक यानी पोलिसांना तपासात सहकार्य करावे

२)जेव्हा गरज पडेल तेव्हा पोलिस स्टेशन ला हजेरी लावणे,

३)फिर्यादिवर व साक्षीदारांवर कोणताही दबाव आणू नये.