कोरोनावर मात करणाऱ्या राजीव सातवांची तब्बेत पुन्हा खालावली…

rajeev_satav

पुणे : कॉंग्रेसचे खासदार आणि जेष्ठ नेते राजीव सातव यांची तब्बेत पुन्हा एकदा खालवली आहे. राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच सताव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर आता त्यांना न्युमोनिया झाल्याने त्यांची तब्बेत खालावली आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज जहांगीर रुग्णालयात जाऊन थोरात यांचा प्रकृतीची विचारपूस केली. ‘माझी आत्ता डॉक्टरांशी चर्चा झाली नाही. मात्र वर्षा गायकवाड या इथेच आहेत. त्यांची डॉक्टरांशी चर्चा झालेली आहे. सातव नॉर्मल वर येत होते. पुन्हा थोडा त्रास झालेला आहे.पण ते लवकरच बरे होतील’. अस बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

19 एप्रिल ला सातव यांना कोरोना ची लक्षणे जाणवली होती त्यानंतर 23 तारखेपासून ते पुण्यात उपचार घेत आहेत. त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. त्यांची तब्येत सुधारत असतानाच काल सातव यांना त्रास झाला. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या कालपासून मुक्कामी थांबल्या आहेत. तर रजनी सातव आज सकाळी पोचल्या आहेत. थोरात यांची भेट झाल्या नंतर त्यांनी सातव यांचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

IMP