fbpx

लोकसभेत काँग्रेसच्या गटनेतेपदी अधीर रंजन, राहुल गांधींचा नेतृत्व करण्यास नकार कायम

टीम महाराष्ट्र देशा: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीचे दारुण पराभव झाल्यानंतर सभागृहात पक्षाचे नेतृत्व करण्यास नकार दिला आहे, त्यामुळे आता पश्चिम बंगालमधून खासदार असणारे अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेत काँग्रेसचे गटनेते पद देण्यात आलं आहे.

लोकसभेतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देत संसदेत पक्षाचे नेतृत्व करण्यास नकार दिला होता. पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुल यांचा नकार आद्याप कायम आहे. त्यामुळे अखेर रंजन चौधरी यांची गटनेतेपदी वर्णी लागली आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजप – तृणमूलमध्ये सुरू असणाऱ्या राजकीय संघर्षात काँग्रेसने अधीर रंजन चौधरी यांना संसदेतील नेतृत्व देण्याची खेळी केली आहे. पूढील वर्षी होणाऱ्या बंगालमधील विधानसभा निवडणुका पाहता काँग्रेसने राजकीय खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. अधीर रंजन चौधरी हे गेली पाच टर्मपासून लोकसभेत खासदार आहेत