काँग्रेसच्या अधोगतीबाबत चिंतन करण्याचा काँग्रेसचा विषय संपला – राधाकृष्ण विखे पाटील

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या अधोगतीबाबत चिंतन करण्याचा काँग्रेसचा विषय संपला आहे अशी टीका विखे पाटील यांनी केली. संगमनेरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे, याबाबत त्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. याचदरम्यान, त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे अनेक नेते काँग्रेसमध्ये आहेत. या नेत्यांनी आता स्वतःहून बाजूला होऊन नव्यांना संधी देण्याची आवश्यकता आहे असे वक्तव्य त्यांनी केले.

विशेष म्हणजे, विखे पाटील यांनी त्यांच्या या वक्तव्यातून अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात याचे नाव न घेता टीका केली आहे. याचबरोबर, काँग्रेसच्या अधोगतीबाबत चिंतन करण्याचा काँग्रेसचा विषय संपला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.