अशोक चव्हाण खूप गोष्ठी चांगल्या करतात, मात्र घोटाळेही – पतंगराव कदम

सांगली: ‘शंकरराव चव्हाण असो की अशोक चव्हाण सगळे चव्हाण आमच्या कुंडलीतच आहेत, अशोक चव्हाण हे खूप गोष्ठी चांगल्या करतात, पण मध्येच काही घोटाळेही करतात; असे म्हणत कॉंग्रेस नेते पतंगराव कदम यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना चांगलीच कोपरखळी मारली आहे. स्वर्गीय मदन पाटील यांच्या जयंती निमित्त सांगलीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान अशोक चव्हाण यांनी ‘पतंगराव कदम यांच्या मनात काही नसतं, ही त्यांची बोलण्याची शैली आहे. त्यामुळे त्यांचं मनावर घेयच नाही’ म्हणत पतंगराव कदम यांच्या विधानाची सारवासारव केली आहे.