काँग्रेसचे नेते पंडीतराव धुमाळ राष्ट्रवादीच्या वाटेवर; लवकर प्रवेश होण्याची शक्यता

लातूर : जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते पंडीतराव धुमाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असून लवकरच त्यांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. पंडीतराव धुमाळ हे काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते आहे. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

पंडीतराव धुमाळ यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे. यामुळे पक्षाची अंतर्गत गटबाजी थांबून गावागावात पक्ष वाढीसाठी प्रयत्न होणार का याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराला मानणारा मोठा वर्ग निलंगा तालुक्यात फार पुर्वीपासून आहे.

निलंग्यात राष्ट्रवादीचे आगोदरच दोन गट निर्माण झालेले आहेत. नगरपालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना पक्षातील गटबाजी थांबवून वरिष्ठ पातळीवरून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. निलंगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी कधी संपणार असा सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या