अशोक चव्हाण अध्यक्षपदाच्या लायकीचे नाहीत: नारायण राणे

२१ सप्टेंबरला घेणार मोठा निर्णय

वेबटीम : आपल्याला विचारल्या शिवाय कॉंग्रेसचा कोणताही निर्णय होत नाही, मग सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त कशी काय केली , तसेच अशोक चव्हाण अध्यक्षपदाच्या लायकीचे नसल्याची घणाघाती टीका करत नारायण राणे यांनी कॉंग्रेस नेत्यांना चांगलच फैलावर घेतल आहे. प्रदेश काँग्रेसने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करताच नारायण राणे आज प्रत्युत्तर म्हणून कोकणात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं . यावेळी कुडाळमधील सभेत नारायण राणे यांनी कॉंग्रेस नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून ते कॉंग्रेस संपवायला निघाल्याची तक्रार आपण सोनिया गांधी यांच्याकडे केली होती अशी माहिती यावेळी राणे यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले कि, नारायण राणे नाराज असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात येत होत्या मात्र काँग्रेसचा एकही नेता माझ्याशी बोलला नाही. राणेंना डिवचलं की राणे आणखी वर येतो हे अशोक चव्हाणांना कळले नसल्याची टीका राणे यांनी केली आहे. दरम्यान कॉंग्रेसन आपल्यावर अन्याय केला असून आता त्यांना त्यांची पत दाखवून देऊ तसेच २१ सप्टेंबरला मोठा निर्णय घेणार असल्याच राणे यांनी यावेळी सांगितल आहे.

दरम्यान आता २१ सप्टेंबरला राणे काय निर्णय घेणार तसेच त्यांचा भाजप प्रवेश कधी होणार याकडे सर्वांच लक्ष लागल आहे.

You might also like
Comments
Loading...