मुख्यमंत्र्याविरोधात नाना पटोलेंनी दाखल केला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; हे आहे कारण

भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत पक्षाला रामराम करणारी नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

गोंदिया जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नसल्याच विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, सातव्या राज्यस्तरीय अखिल भारतीय संत साहित्य संमेलनात ते बोलत होते. दरम्यान, २०१७ मध्येच 18, तर चालू वर्षात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याचा दावा नाना पाटोले यांनी केला आहे.

शेतकरी आत्महत्या सुरु असतानाही मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत, असे विधान करून त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप नाना पटोले यांच्याकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पटोले यांनी गोंदियातील देवरी पोलिस स्टेशनमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

You might also like
Comments
Loading...