काँग्रेसला मोठा धक्का! ‘या’ नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश

नांदेड: हदगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे निष्ठावंत तथा एडव्होकेट राजीव सातव यांचे खंदे समर्थक तथा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांनी मुंबई येथे जाऊन बुधवार 9 ऑक्टोबर रोजी सकाळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. यावेळी हदगाव विधानसभेचे शिवसेना उमेदवार आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची उपस्थिती होती.

चाभरेकर त्यांच्यासमवेत याच मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भगवानराव पवार पाथरडकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासाठी शुभ मानला जात असून काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

याच मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर नेते बाबुराव पाटील कोहळीकर यांनी कंबर कसली असून विद्यमान आमदार आष्टीकर यांना घेरण्याची त्यांनी तयारी केली आहे. गंगाधर पाटील यांच्या प्रवेशामुळे एडव्होकेट सातव आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. यांचा प्रवेश आमदार आष्टीकर यांना फायद्याचा ठरेल हा येणारा काळ ठरवेल.

महत्वाच्या बातम्या