fbpx

काळ्या जादूच्या संशयातून कॉंग्रेस नेत्याने दाखल केली पोलिसात तक्रार

केरळ – केरळचे ज्येष्ठ काँग्रेस नेते व्ही.एम.सुधीरन यांनी काळ्या जादूच्या संशयातून पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. रविवारी त्यांना  घराबाहेरील बागेत एक बंद बाटली जमिनीत पुरलेली आढळली. यामध्ये तांब्याच्या काही विचित्र वस्तू सापडल्या, त्यानंतर सुधीरन यांनी काळ्या जादूच्या संशयातून पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

अशाप्रकारच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत, पण मी यावेळी पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतलाय. नवव्यांदा अशाप्रकारची घटना घडली, असं सुधीरन यांनी माध्यमांना सांगितलं. सापडलेल्या सर्व वस्तू पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत. आधुनिक जगामध्ये अशाप्रकारच्या गोष्टी करणारे आणि अशा गोष्टींवर विश्वास ठेवणा-यांचं मला वाईट वाटतं, असंही यावेळी सुधीरन म्हणाले.

1 Comment

Click here to post a comment