काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांचं निधन

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचं दीर्घ आजाराने निधन झालंय. लोणी प्रवरामधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८४ वर्षांचे होते.

बाळासाहेब विखे पाटील यांचं सहकार क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे. त्यांचे वडील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यातल्या लोणीमध्ये सहकारी साखर कारखाना सुरू केला. हा आशियातला पहिला साखर कारखाना होता. बाळासाहेब विखे पाटील यांनी ही सहकाराची परंपरा सुरू ठेवली.

बाळासाहेब विखे पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून २०१० मध्ये त्यांना पद्मभूषण किताबाने सन्मानित करण्यात आलं होतं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे बाळासाहेब विखे पाटील यांचा मुलगा आहेत.

बाळासाहेब विखे पाटील यांची कारकीर्द

– जिल्हा परिषदेपासून राजकीय जीवनाला सुरुवात
– सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात चार दशकांची कारकीर्द
– महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात मोठं योगदान
– सहकार, शिक्षण, उद्योग, शेतीक्षेत्रात योगदान
– 1980 मध्ये प्रवरानगरमध्ये राज्यातलं पहिलं तंत्रनिकेतन महाविद्यालय
– 1981 ते 1984 पर्यंत राज्य साखर संघाचे अध्यक्ष
-1999मध्ये वाजपेयी मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थराज्यमंत्री
– केंद्रीय अर्थराज्यमंत्री असताना ग्रामीण भागासाठी 75 हजार कोटींची तरतूद