काँग्रेस नेता सकाळी भाजपमध्ये संध्याकाळी परत कॉंग्रेसमध्ये

मंगळुरु: कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. भाजपमधील काही खासदार पक्षाच्या भूमिकेवर नाराज आहेत. तसेच पक्षांतर्गत वाढत चाललेले वाद भाजपची डोकेदुखी ठरू शकते. दरम्यान, एक विचित्र घटना कर्नाटकात घडली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आलं आहे.

कर्नाटक मध्ये एका काँग्रेस नेत्याने सकाळी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. पण संध्याकाळपर्यंत पुन्हा भाजपला रामराम करुन काँग्रेसमध्ये घरवापसी केली. त्यामुळे या नेत्याने भाजपची टिंगल तर उडवली नाही ना ? अशी शंका निर्माण होत आहे. कर्नाटक सरकारमधील वनमंत्री बी रामनाथ राय यांच्याविरोधात निवडणूक लढणारे भाजप नेते यू राजेश नाईक यांनी रविवारी एका कार्यक्रमात काँग्रेस नेते सुंदर देवीनागर यांचं पक्षात स्वागत केलं. पण काही तासातच मणीमधील आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापासी केली.