लोकसभेची सेमीफायनल- मध्यप्रदेशात कॉंग्रेस नेते कमलनाथ यांच्या घरी

टीम महाराष्ट्र देशा – आज जाहीर होत असलेल्या पाच राज्यांच्या निकालात काँग्रेसने बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. मध्यप्रदेश मध्ये मात्र काँग्रेस-भाजपा यांच्यात जोरदार ‘काँटे की टक्कर’ सुरु आहे. २३० मतदारसंघापैकी सध्या कॉंग्रेस ११२ जागांवरती पुढे आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सध्या १०३ जागांवरती पुढे आहे.

अजूनही अंतिम चित्र स्पष्ठ झाले नसले तरी सत्तेची खलबते मात्र सुरु झाली आहेत. त्यामुळे कॉंग्रेस नेते कमलनाथ यांच्या घरी कॉंग्रेस नेते यायला सुरुवात झाली आहे. काही वेळापूर्वी ज्योतिरादित्य सिंधिया काही वेळापूर्वी कमलनाथ यांच्या घरी पोहचले होते तर आताच दिग्विजयसिंह देखील पोहचले. अंतिम निकाल यायला अजून कालावधी बाकी आहे, पण कॉंग्रेस बहुमताच्या दिशेने जात असताना सत्त्तेची खलबते मात्र सुरु झाली आहेत.

You might also like
Comments
Loading...