नांदेडमधील कॉंग्रेसचा विजय म्हणजे भाजपच्या परतीचा प्रवास सुरु – अशोक चव्हाण

ashok chavhan

मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या नांदेड- वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपला अक्षरश धोबीपछाड केले आहे. एकूण ८१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ७१ जागांवर विजय मिळवला, तर भाजपला ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तसेच शिवसेनेला केवळ १ जागा मिळाली आहे. तर तीन जागांची मोजणी अजून सुरु आहे. दरम्यान नांदेडच्या नागरिकांनी भाजपच्या खोट्या प्रचाराला धुडकावून लावल असून भाजपच्या परतीचा प्रवास सुरु झाल्याची खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. नांदेडमधील घसघशीत यशानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यातील इतर निवडणुकांप्रमाणे नांदेडमध्ये झालेल्या भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला नांदेडकरांनी चोख उत्तर दिले असून जे कोणी भाजपमध्ये गेले ते सर्वजन पराभूत झाल्यचही अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.