अशा घटना म्हणजे राज्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे – अशोक चव्हाण

Ashok Chavan

टीम महाराष्ट्र देशा : पिक कर्जासाठी शरीर सुखाची मागणी करणारी घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. अशा घटना म्हणजे राज्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. अशी भावना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक मॅनेजरने पिककर्ज मंजुर करण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. फिर्यादीवरुन बँक मॅनेजरवर अट्रोसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॅनेजरला सहकार्य करणाऱ्या शिपायावरही गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे अशोक चव्हाण यांनी हा संताप व्यक्त केला आहे.

मलकापूर तालुक्यात उमाळी येथील शेतकरी गुरुवारी 14 जून रोजी सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत त्यांच्याकडे असलेल्या दोन एकर शेतीवर पिककर्ज मागणीसाठी पतीपत्नीसह गेले. सर्व कागदपत्रे जमा करून बँक मॅनेजरला पिककर्ज केव्हा मिळेल याबाबत विचारणा केली. बँक मॅनेजरने मोबाईल नंबर घेत मी कर्ज मंजुरीबाबत मोबाईलवर कळवितो असे सांगितले.

ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. अशा घटना राज्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार असुन, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट माझा हे सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. तसेच या प्रकरणात केवळ गुन्हा दाखल करुन चालणार नाही, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी खासदार चव्हाण यांनी केली.

सबंधित बातम्या 

संतापजनक : पिककर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे – धनंजय मुंडे

Loading...