कॉंग्रेसचं नक्की चाललंय तरी काय, हर्षवर्धन पाटलांच्या कन्येला झेडपीमध्ये पवारांची जागा ?

blank

टीम महाराष्ट्र देशा : पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतील गेल्या तीन महिन्यापासून रिक्त झालेले पदावरून काँग्रेसच्या दोन सदस्यांमध्ये नक्की कोणाला संधी मिळणार यावरून रणकंदन सुरु होत. मात्र, आता हा तिढा आता सुटणार आहे.

या समितीवरील आणखी एक पद रिक्त झाल्याने या एकाच जागेसाठी हट्ट धरून बसलेल्या दोघांचाही आता या समितीवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या दोघांनाही आता या समितीवर आपोआपच संधी मिळणार आहे.

एका रिक्त पदावरुन काँग्रेसचे सदस्य दत्ता झुरंगे (पुरंदर) आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांच्यात अंतर्गत वाद निर्माण झाला होता. त्यामुळे हे पद दोघांपैकी कोणाला मिळणार? या वादात रिक्त ठेवण्याची वेळ जिल्हा परिषदेवर आली होती. हर्षवर्धन पाटील यांच्या आई रत्नप्रभादेवी पाटील यांच्या आकस्मिक निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.

दरम्यान, या समितीवर सदस्य असणारे रोहित पवार हे यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व संपुष्टात आले आहे.

परिणामी, स्थायी समितीची आणखी एक जागा रिक्त झाली आहे. सध्या दोन जागा रिक्त असल्याने अंकिता पाटील आणि झुरंगे या दोघांनाही संधी मिळणार आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा नोव्हेंबर अखेरच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र हर्षवर्धन पाटील यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर देखील त्यांच्या कन्येचा हट्ट कॉंग्रेस का पुरवत आहे ? असा सवाल उपस्थित होत आहे. विधानसभा निवडणुकीनत अंकिता पाटील यांनी पक्षशिस्त मोडत भाजपचा उघड प्रचार केला होता. त्यामुळे पाटील यांच्यावर कारवाई करण्याची सोडून त्यांना पद दिले जात असल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी आहे.

महत्वाच्या बातम्या