‘सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध’

टीम महाराष्ट्र देशा : ‘माफिया डॉन करीम लाला-इंदिरा गांधी’ भेटीबाबत वक्तव्य करत वाद ओढवून घेणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत नवे वक्तव्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याला विरोध करणाऱ्यांना ज्या तुरुंगात इंग्रजांनी सावरकरांना ठेवले होते, त्याच तुरुंगात पाठवायला हवे, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांच्या सावरकरविरोधी वक्तव्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये कटुता आली आहे. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसदरम्यानचे संबंध बिघडण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे.

Loading...

ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलता वडेट्टीवार म्हणाले, ‘सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध आहे. सत्तेसाठी आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही. सावरकरांबाबतची भूमिका राऊतांना लखलाभ”, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली आहे.

दरम्यान, ‘सत्तेसाठी आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना समज द्यावी,’ अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ‘भविष्यात संजय राऊतांनी वक्तव्य करताना काळजी घ्यावी. संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत येत्या काळात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे,’ अशी माहिती देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण