नरेंद्र मोदी नीच आहेत, मी बरोबर बोललो होतो – मणिशंकर अय्यर

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यासाठी १९ मे रोजी मतदान होणार आहे, तत्पूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी आरोपप्रत्यारोप चालवले आहेत. कॉंग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

मी नरेंद्र मोदी यांना नीच बोललो तेच योग्य होतं, असं मणिशंकर अय्यर यांनी म्हटलं आहे. अय्यर यांनी यापूर्वी देखील मोदी यांना नीच माणूस, गंदी नाली का किडा, अशी टीका केली होती. अय्यर यांच्या टिकेनंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे निलंबन केले होते.

Loading...

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील मणिशंकर अय्यर यांनी असेच वादग्रस्त विधान केले होते. अय्यर यांनी मोदींचा उल्लेख ‘चहावाला’ म्हणून करत हिनवल्याने काँग्रेसला फटका बसला होता. दरम्यान, आता अय्यर यांनी पुन्हा एकदा मोदींवर जहरी टीका केल्याने खळबळ उडाली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजूनही तरुणांना नियुक्त्या न मिळणं हे दुर्देवी : देवेंद्र फडणवीस