20 फेब्रुवारीला महाआघाडी फुंकणार प्रचाराचे रणशिंग

RAHUL WITHA SHARAD PAWAR

टीम महाराष्ट देशा: लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यामध्ये कॉंग्रेस – राष्ट्रवादीसह उतर पक्षांच्या महाआघाडीची नांदेडमधून प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

केंद्रातील भाजप सरकार विरोधात दोन्ही कॉंग्रेसने इतर घटक पक्षांना एकत्र करत महाआघाडी स्थापन केली आहे. यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला देखीला ठरला आहे. यानंतर आता प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे होमग्राउंड असलेल्या नांदेडचि निवड करण्यात आली आहे.

महाआघाडीच्या सभेला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार, रिपब्लिकनचे जोगेंद्र कवाडे यांच्यासह इतर पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, १ मार्च रोजी धुळ्यामध्ये कॉंग्रेसकडून राहुल गांधी यांची स्वतंत्र सभा घेण्यात येणार आहे.