ऐकावे ते नवलचं ! कॉंग्रेस बनवणार एक दिवसाचा मुख्यमंत्री

Congress

टीम महाराष्ट्र देशा:- सध्या राज्यात विधानसभा निवडनुका या तोंडावर येवून ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन सर्वच पक्षांकडून राज्यात करण्यात आले आहे . याचं विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा मतदारांसाठी युवक काँग्रेसने एक अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. या अंतर्गत काँग्रेस युवकांना एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची संधी देणार आहे. ‘मैं भी नायक, सीएम फॉर अ डे’ असं या मोहिमेचं नाव आहे.

महाराष्ट्र युवक कॉंग्रेसने वेक अप महाराष्ट्र अभियांना अतर्गंत ही जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी ६ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करणे गरजेचे आहे. या स्पर्धेत तरुणांना त्यांचं स्वप्न, महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांच्या सूचना द्यायला सांगण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यातील दोन विजेते निवडले जातील. त्यांना ‘विधानसभेचं तिकीट’ देऊन मुंबईला पाठवलं जाईल. यापैकी पाच जणांची ‘मैं भी नायक, सीएम फॉर अ डे’ साठी निवड होईल. हे युवक वेक अप महाराष्ट्र अभियानाचाही भाग होतील.

या अभियाना बद्दल महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी बोलतांना सांगितले की, तरुण आज सोशल मीडियावर स्वत:ची राजकीय, सामाजिक मतं हिरिरीने मांडत असतात. पण त्यांना वास्तव काय आहे, याचं आकलन अनेकदा होत नसतं. उदाहरणार्थ, हिंजवडीच्या अनेक युवकांना हे माहित नाही की राजीव गांधी इन्फोटेक पार्क आधीच्या काँग्रेस सरकारचं योगदान आहे. म्हणून आम्ही युवकांपर्यंत पक्षाचं काम घेऊन अभियानाच्या माध्यमातून जाणार आहोत.

महत्वाच्या बातम्या