fbpx

काँग्रेस, जेडीएसला मोठा धक्का ; कर्नाटकमधील कुमारस्वामींचं सरकार कोसळलं

टीम महाराष्ट्र देशा :  काँग्रेस, जेडीएसला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकमधील कुमारस्वामींचं सरकार बहुमत चाचणीत अपयशी ठरलं असून, कुमारस्वामींचं सरकार कोसळलं आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात मुख्यमंत्री कुमारस्वामी अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमधील राजकीय परिस्थिती गोंधळलेली होती. सत्ताधारी जेडीएस आणि कॉंग्रेसच्या १५ आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे कर्नाटकमधील सरकार कोसळण्याच्या मार्गावर होते. कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामींच्या सरकारची बहुमत चाचणी घेण्यात आले. दरम्यान बहुमत चाचणीत कुमारस्वामी यांचं सरकार अपयशी ठरलं असल्याचे दिसून आले.

आज विधानसभेत कुमारस्वामी सरकारची बहुमत चाचणी घेण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव मांडला. मात्र कुमारस्वामी यांचं सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरलं. कुमारस्वामींचं सरकार कोसळलं. कॉंग्रेस आणि जेडीएसला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.

विशेष म्हणजे कुमारस्वामींचं सरकार कोसळलं असल्याने आता भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता कर्नाटकात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.