fbpx

राम मंदिरासाठी कॉंग्रेसचंं अडथळा : मोदींचा अजब दावा

टीम महाराष्ट्र देशा : राम मंदिराच्या निर्माणासाठी कॉंग्रेसच अडथळा करत असल्याचा अजब दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.दिल्ली येथील रामलीला मैदानावर सुरु असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.या कार्यक्रमाला अनेक केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित होते.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, सध्या राम मंदिराबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. काँग्रेस त्यांच्या वकिलांच्याद्वारे न्याय प्रक्रियेत बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसने सरन्यायाधीशांना पदावरून हटवण्यासाठी महाभियोग आणण्याचाही प्रयत्न केला होता आणि काँग्रेसची राम मंदिर व्हावं अशी इच्छा नसल्याने कॉंग्रेस अडथळा करत असल्याचा अजब दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

याअगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनेकडून राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती त्यावेळी मात्र मोदींनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे अध्यादेश काढणार नसल्याचे सांगितले होते.देशात पूर्ण बहुमत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा प्रकारचा दावा करत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

2 Comments

Click here to post a comment